Posts

थोडा है थोडे की जरुरत है @12.12.23

Image
मरायचं काही करता येईल का ? गेले दोन आठवडे मला आजपर्यंत कधीच आले नाही एवढे फोन येत आहेत . हे सर्व फोन ज्येष्ठ नागरिकांचे आहेत . माझ्याशी ही मंडळी भरभरून बोलत आहेत व त्यांचा बोलण्याचा उत्साह बघून मी देखील त्यांना बऱ्यापैकी वेळ देतोय . यात आजोबांसोबत बऱ्याच आज्या पण आहेत . हे सारे फोन मला येण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी दै . हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात मी माझे सर डॉ . सत्यनारायण लोहिया यांनी केलेल्या लिव्हींग वील बद्दल एक लेख लिहीला होता . तो लेख मी माझ्या थोडा है थोडे की जरुरत है या ब्लॉगवरून शेअर केला होता . मला माहित नाही कसे परंतू हा लेख मुंबई , पुणे , औरंगाबाद , कोकण या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांच्या व्हॉट्स ॲप समुहामधे पोहोचला . त्या लेखासोबत माझा दूरध्वनी क्रमांक दिला असल्याने ज्यांना ज्यांना हा लिव्हींग वीलचा विषय पटला त्यांनी मला फोन करणे सुरु केले . मला देखील या सर्व ज्येष्ठ मंडळींना याबद्दल सांगणे , त्या वीलची कॉपी पाठविणे व त्याच्या शंकांचे निरसन करण...

थोडा है थोडे की जरुरत है @05.12.23

Image
डीफेन्स मेकॅनिझम माझ्या मागच्या लेखात मी वर्णन केलेल्या घटनेबद्दल काही वाचकांनी आपली फारच छान मते नोंदविली . काही जणांनी हे असे एखादा गुंड किंवा मस्तवाल श्रीमंतच करु शकेल असे लिहीले . त्या माझ्या वाचकांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की अश्या पद्धतीचा ताणाचा उद्रेक कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतो . त्यासाठी गुंड प्रवृत्तीच असायला हवी असे नाही . अगदी सामान्य जीवन जगणाऱ्या कुणाच्याही जीवनात अश्या पद्धतीची रीएक्शन दिल्या जाऊ शकते . याचे कारण ज्यावेळी अशी रीएक्शन दिली जाते त्यावेळी मेंदुची सारसार विचार करण्याची क्षमता संपलेली असते व साचत गेलेल्या ताणांनी त्या सारासार बुद्धीमत्तेची जागा अविचाराला दिलेली असते . अगदी काही दिवसांपूर्वी विश्वचषकाच्या अंतीम सामन्यात भारताचा पराभव झाला त्यानंतर त्याचा राग म्हणून एका माणसाने आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याची बातमी मी वर्तमानपत्रात वाचली . बरे झाले आपली टीम हरली असे त्या लहान भावाने मोठ्या भावाला चिडविले होते व त्यामुळे त्...