Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 10.09.23

Image
श्री गणेशा … वेगवेगळ्या वर्गांमधे अचानक भेट देऊन तरुण विद्यार्थ्यांशी बोलणे ही माझी जुनी सवय आहे . त्यांना काही सांगण्यापेक्षा त्यांच्या मनात नेमके काय चालले आहे याचा अंदाज घेणे हा या असल्या भेटींमागचा माझा हेतू असतो .  माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होतात व मी त्यांच्याशी छान मैत्री प्रस्थापित केली असल्याने मोकळेपणाने बोलतात . आपल्याला महाविद्यालयात काय नवीन करता येईल याचे सर्वात चांगले इनपुट मला   या असल्या भेटींमधेच मिळते . मी ते माझ्या सहकाऱ्यांशी शेअर करतो व त्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही सारे मिळून कार्यक्रमांची व उपक्रमांची आखणी करतो . परंतू आम्ही महाविद्यालयात चालवित असलेल्या शिक्षण प्रणालीवरच थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक प्रश्न मला एका विद्यार्थिनीने विचारला . तो प्रश्न मला एवढा अस्वस्थ करून गेला की अनेक वर्षांपासून चालत आलेली ही संपुर्ण शिक्षण प्रणाली आमुलाग्र बदलणारे नवे शैक्षणिक धोरण का आवश्यक आहे हे मला मनोम...

थोडा है थोडे की जरुरत है @ 12.09.23

Image
संपर्काविना मी … माझ्या जवळच्या सर्व वस्तू व सर्वात महत्वाचा म्हणजे मोबाईल फोन त्यांनी काढून घेतल्यानंतर आता माझ्या जगाशी मी संपर्क कसा करणार , काही अडचण आली तर ते सारे लोक मला संपर्क कसा करणार याचा विचार करतच मी गांधीनगरच्या त्या अतिभव्य अक्षरधाम या वास्तूमधे प्रवेश केला . २००२ मधे या मंदीरावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे हा सर्व सुरक्षा प्रबंध करण्यात आला आहे असे मला सांगण्यात आले . एखाद्या अभेद्य किल्ल्यात प्रवेश केल्यागत मला वाटले , जेथून जगाचा संपर्क तुटून गेला आहे असेही वाटले . परंतू त्या प्रशस्त परीसरात प्रवेश केल्यावर , तेथील रचना , तेथील विविध देखावे , बगीच्याची रचना व सर्वात महत्वाचे म्हणजे त्या संपुर्ण वास्तुचे पावित्र्य टिकविणारी स्वच्छता आणि शांतता . कामाचा दिवस असल्याने फार गर्दी देखील नव्हती . मी हळू हळू त्या मुख्य स्वामी नारायण मंदीराकडे चालू लागलो व त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मागे असलेले जग हळूहळू माझ्या मनातून दूर जाऊ लागले . सभोवतालचा सुंदर ...