थोडा है थोडे की जरुरत है @ 15.08.23
स्वातंत्र्य … नव्या विचारांचे एक थेट प्रश्न विचारतो . आपल्यापैकी किती लोक आपल्या घरातील मोठ्या होत असलेल्या पौगंडावस्थेतील मुला - मुलींशी सेक्स या विषययावर थेट व स्पष्टपणे बोलू शकतो ? मला उत्तर मिळाले . सेक्स हा शब्द वाचल्याबरोबर आज थोडा है .. मधे हे काय भलतेच लिहीलंय सरांनी असे म्हणून आपण पेपर किंवा मोबाईलवर शेअर केलेला लेख कुणाला दाखवायचा नाही हा विचार केला असणार . हाच प्रश्न पुन्हा एका विशिष्ट गटाला विचारतो . आपल्यापैकी शिक्षकी पेशामधे असणारे किती लोक आपल्या विद्यार्थ्यांशी वर्गामधे सेक्स बद्दल मोकळेपणाने बोलू शकतो ? पुन्हा मला उत्तर मिळाले . नेहेमी अविनाश मोहरील यांचा लेख मुलांना पण वाचायला सांगतो पण आज तर यांनी भलतेच काहीतरी लिहीणे सुरु केले आहे असा विचार मनात आला असणार . अविनाश , तुझा मुलांच्या संवेदनशीलतेबद्दलचा लेख मी वर्गात वाचून दाखविला असे सांगणारी माझी शिक्षक मैत्रिण हा लेख कदाचित वाचून दाखविणार नाही कारण यामधे मी जो विषय मांडतो आहे तो मुलांना ...