Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 16.07.23

Image
डीमोशनल टीव्ही वरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात मी सध्याच्या दोन यशस्वी सिने कलावंतांची मुलाखत बघत होतो . एका खूप छान विषयावर चर्चा सुरु होती . मुलाखतकाराने प्रश्न विचारला की बरेच वेळा चित्रपटातील एखाद्या सीनमधे तुम्ही जेव्हा पूर्णपणे समर्पित होऊन काम करीत असता तेव्हा मनाने तुम्ही त्या पात्राशी जोडले गेलेले असता . तसे केल्यामुळेच तुमचा अभिनय लोकांना भावतो . त्या पात्राच्या दुःखांशी जेव्हा तुम्ही समरस होता तेव्हाच डोळ्यातून आपोआप अश्रू येतात व ते ग्लिसरीन लावून आलेले नसतात कारण त्यावेळी तुमच्या चेहेऱ्यावरील रेषा देखील बोलत असतात . याचाच अर्थ तुम्ही त्या कृत्रिम असलेल्या परिस्थितीमधे ती भूमिका जगत असता . परंतू हे सारे कॅमेरा रोलींग असतानाच राहते की दिग्दर्शकाने कट म्हणल्यावरही त्या दृष्याचा परीणाम मनावर राहतो व त्याचा त्रास होतो ? या अतिशय महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्या अभिनेत्रीने फार सुंदर शब्द वापरला . ती म्हणाली आम्ही डीमोशनल ही प्रक्रीया करतो . त्या अभिनेत्...

थोडा है थोडे की जरुरत है @ 11.07.23

Image
उर्मट नकार रविवारी नेहेमीप्रमाणे फळे घेण्याकरीता मी माझ्या नेहेमीच्या दुकानामधे गेलो . एक फारच वेगळा अनुभव मला यावेळी तेथे आला . खरे सांगायचे तर अश्या प्रकारचा अनुभव मला पहिल्यांदाच आला . व्यवसायामधे येणारी नवी पिढी कश्या प्रकारे पुढे येते आहे याचे ते उदाहरण होते . अर्थात या अनुभवामुळे हे सार्वत्रिक आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही परंतू असे जर नव्या पिढीचे होत असेल तर ही गोष्ट त्यांच्याच भविष्याकरीता फार घातक ठरणारी आहे . कारण मी जो प्रकार अनुभवला तो नोकरीमधे काही प्रमाणात सहन केल्या जाऊ शकतो व तो देखील सरकारी नोकऱ्यांमधे . परंतू खाजगी नोकऱ्या किंवा व्यवसायांमधे जर असा प्रकार होत असेल तर मात्र काळजी घेणे गरजेचे आहे . कारण आता नव्या पिढीच्या मुला मुलींना स्वयंरोदजगाराशिवाय पर्याय नाही किंना नवे शैक्षणिक धोरण देखील स्वयंरोजगाराकरीता तरुणांना प्रशिक्षण देण्यावर भर देणारे आहे . अश्यावेळी व्यवसायामधल्या इतर सर्व गोष्टी शिकल्या तरी मला आला तसा अनुभव देणारा ॲटीट्यूड...