थोडा है थोडे की जरुरत है @ 13.06.23
मेट्रीक्स रीलोडींग ( २ ) एका मोठ्या घरात राकेश बसलेला असतो . त्याच्या समोरची मोठी भिंत म्हणजे एक हाय डेफीनेशन स्क्रीन असतो . त्याने डोळ्यावर एक व्हीज्युअलायझर नावाचे यंत्र बसविलेले असते . समोरच्या स्क्रीनवर लाटांनी फेसाळलेला समुद्र असतो . त्याच्या व्हिज्युअलायझरमुळे तो जवळपास त्या दृश्यांमधे पोहोचलेला असतो . विस्तीर्ण समुद्रकिनारा , पांढरी शुभ्र वाळू , खळखळत्या लाटांचा आवाज , मधे पक्षांचा किलबीलाट , बॅकग्राऊंडला छान मंद संगीत . हे सारे तो प्रत्यक्ष अनुभवत होता . अचानक त्याला असे वाचले की अश्या सुंदर समुद्रकिनारी हातात शॅम्पेनचा ग्लास हवा . त्याने बोलूनच ऑर्डर दिली , अमल , ( त्याच्या व्हर्च्युअल अस्टीटंट चे नाव ) माझ्यासाठी एक ग्लास शॅम्पेन पाठव . अमल ने प्रेमाने उत्तर दिले . लगेच पाठवते सर . काही क्षणात राकेशच्या उजव्या बाजुच्या भिंतीचा एक कप्पा उघडला गेला व त्यामधून हळूवार सरकत एक शॅम्पेनचा ग्लास त्याच्याकडे आला . त्याचे सीप घेत घेत तो पुन्हा समुद्रकिनारा एन्जॉय करु लागला . पुन्...