Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 14.02.23

Image
तू कोण ? तू कोण आहेस ? काय नाते आहे आपले ? सांग ना कोण आहेस तू ? माझे सारे जग व्यापून टाकले आहेस . तसे बघितले तर तू माझ्या सोबत नाहीस , कित्येक दिवस आपली भेट होत नाही , कामांच्या गडबडीत बोलणे देखील होत नाही . परंतू तू माझ्या सोबत आहेस ही जाणीव कायम मनाला धीर देते . खचून जायला होतं कधी कधी . संकटांची मालिका सुरू असते . एका पाठोपाठ एक काहीतरी वाईट घडत राहतं . लढाई सुरु असते . कधी कधी तर असे वाटते की देवालाही माझी परीक्षा घेणे आवडते म्हणून जरा श्वास घेऊ देत नाही . पण या सर्व लढायांमधे मला उभे राहता येते ते केवळ तुझ्यामुळे . जेव्हा अडचणींची व अडथळ्यांची शर्यत पार करून करून दम भरून येतो व निवांत जगण्यासाठी लागणारे श्वास कमी पडायला लागतात तेव्हा … मी तुझ्यासोबत आहे .. कायम … हे तुझे वाक्य त्या राहीलेल्या श्वासांची भरपाई करते आणि मोकळे वाटायला लागते . या तुझ्या आधाराच्या ताकदीचे मला फार आश्चर्य वाटते . कसे काय जमते हे तुला ? खरे तर माझ्या अडचणींचा पाढा एवढा मोठ...

थोडा है थोडे की जरुरत है @ 07.02.23

Image
एकच शब्द उच्चारा .. मला असे वाटतेय अविनाश की मी माझ्याच लोकांपासून तुटतोय . याचे कारण देखील मला कळतंय . चाळीस वर्षांहून अधिक काळ शिक्षक म्हणून काम केल्यामुळे मला तेवढे निश्चित कळतेय . पण माझे माझ्या स्वतःसोबत एक द्वंद्व सुरु आहे . ज्या वैचारिक प्रक्रीयेला मी आजपर्यंत जपत आलो आहे , ज्या संस्कारांना मी उराशी बाळगून मी एवढी वर्षे आयुष्य घालविले आहे . ज्या गोष्टी आयुष्यभर जपण्यासाठी मी कधीही व कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही त्याच गोष्टींबाबत मला आता माझ्या उतारवयात तडजोड करावी लागत असेल तर मग माझा संताप होतो . काही गोष्टी या नाही पटत म्हणजे नाहीच पटत तर मी काय करावे ? माझे संपुर्ण जिवन मी स्वतः उभे केले . आई लहानपणीच गेली होती . लोकांकडे वार लावले असत . त्यांच्याच भरवश्यावर मी शिक्षण घेतले , मोठा झालो व अत्यंत सचोटीने नोकरी केली . माझे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्दयावर आहेत . अजुनही मला भेटतात तर वाकून नमस्कार करतात व मला म्हणतात की सर , तुमच्यामुळेच मी आज ...