Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 13.02.14

Image
सिवा तेरे कुछ भी …. उद्याचा दिवस १४ फेब्रुवारी   सबंध जगात प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो . खरे तर आपल्या सांस्कृतिक चौकटीत असा प्रेमाचा दिवस बसत नव्हता . असे विशेष दिवस नाहीत असे नाही परंतू ते सारे दिवस सामाजिक दृष्टीने एकत्रीकरण साजरे करणारेच आहेत . केवळ एका व्यक्तीकरीता साजरा केला जाणारा दिवस ही संकल्पना आपल्याकडे नव्हती . परंतू पाश्चिमात्य देशांमधे समाजिक चौकटींपेक्षा व्यक्तिगत विचारांना जास्त प्राधान्य दिले जात असल्याने हे असले दिवस साजरे केले जातात . जागतिकीकरणाच्या प्रक्रीयेमधे विचारांचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात होत असल्याने आता हे सारे दिवस व पर्यायाने प्रेमदिवस आपल्याकडेही साजरा केला जातो . या साजरीकरणाचे स्वरुप बरेचवेळा फार विचित्र असते व त्यामुळे त्यावर टीका देखील केली जाते . परंतू नव्या व तंत्रज्ञानाने जवळपास एकच झालेल्या जगात हे असे प्रभाव दिसणे स्वाभाविक आहे . त्याला फार विरोध करणे कठीण आहे किंबहुना केलेला विरोध संधर्षाच्या पद्धतीने वेगळ्या स्...

थोडा है थोडे की जरुरत है @ 06.02.24

Image
अजुनही ती आहे … भा . रा . तांबे आपल्याला सांगून गेले , जन पळभर म्हणतील हाय हाय .. मी जाता राहील कार्य काय ? खरेच आहे . कुणाच्या जाण्याने कुणाचेच काहीच अडत नाही असा त्या चिरस्मरणीय काव्याचा साध्या भाषेतला अन्वयार्थ आहे . जन्म देताच एखाद्या बाळाची जन्मदात्री त्याला सोडून जाते पण त्या बाळाच्या वाट्याचे दिवस ते बाळ जगतंच , मोठंही होतं . त्यामुळे तांब्यांच्या काव्यातील त्रिकालाबाधीत सत्याला नाकारण्याचे धाष्ट्य कुणीही करु शकत नाही . परंतू असे असले तरी देखील काही व्यक्तींचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव असतो . त्यामुळे कालप्रवाहामधे ते आपल्याला सोडून पुढे निघून जरी गेले तरी देखील त्यांची कमतरता ही पदोपदी जाणवत राहते . आपले जीवन थांबते असे नाही पण त्या व्यक्तीने आपल्याकरीता असे काही कमालीचे मानसिक आधार तयार केलेले असतात की त्या आधारांच्या रुपाने त्या व्यक्तीचे अस्तित्व सारखे जाणवत राहते . अशीच एक व्यक्ती आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात वेगवेगळ्या परीस्थितीतील मानसिक आधारांच्या र...