Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 09.01.24

Image
नवे मायबाप .. दहा वर्षांच्या त्या छोट्याश्या मुलाने अचानक असे काही केले की त्या ड्रॉईंग हॉलमधे बसलेले आम्ही सर्व अवाक झालो . घरात साधारण दहा बारा लोक बसले असताना , एका विषयावर चर्चा सुरु असताना तो मुलगा अचानक हॉलमधे आला काय आणि त्याने ती कृती केली काय … आमच्यापैकी कुणालाही कळलेच नाही . सर्वात महत्वाचे म्हणजे त्या गोष्टीवर त्या मुलाच्या वडीलांनी जी प्रतिक्रीया दिली ती मला जास्त चिंतेत टाकणारी होती . बदलत्या काळात सारे काही बदलते आहे हे सर्वांना मान्य असले तरी घरातील पालक म्हणून आपल्या भूमिका देखील बदलायला हव्या हे अनेक पालकांना कळत नाही याचे मला आश्चर्य वाटले . पालक म्हणून आपल्या स्वभावात करावा लागणारा बदल कठीण असतो हे मला मान्य आहे . बरेचवेळा आपल्या आई वडीलांनी ज्या प्रकारे आपल्याला मोठे केले तीच पद्धत पुढेही राबविली जाते . याचे गमतीदार कारण म्हणजे आमच्या आई वडीलांनी आम्हाला असेच मोठे केले व आम्ही कुठे बिघडलो ? हे अभिमानाने सांगून तीच पद्धत पुढच्या पिढीस...

थोडा है थोडे की जरुरत है @02.01.24

Image
अकाऊंट बंद करुयात … नवे वर्ष आले . नव्या वर्षासोबत अनेक नवे रीझोल्युशन्स ठरले . काहींनी ते मनात ठेवले , काहींनी ते सोशल मिडीयावर सर्वांना सांगितले . प्रकार कोणताही असो , नव्या वर्षापासून आता काहीतरी करायचे असे प्रत्येकानेच ठरविलेले असते . म्हणूनच नवे वर्ष म्हणजे केवळ एक तारीख बदलून दुसरी तारीख येणे एवढाच भाग नाही तर मानसिकदृष्ट्या तो एक चार्जींग पॉईंट असतो . वर वर बघता अनेक मंडळी या नव्या वर्षात काहीना काही नवे सुरु करून त्याचे स्वागत करतात . परंतू अनेक अश्या गोष्टी असतात ज्या मात्र वर्षानूवर्षे सांभाळल्या जातात . मनाच्या खास अकाऊंटमधे त्या ठेवल्या जातात . त्यांच्याबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून त्यावर व्याज देखील वाढविले जाते . हे व्याज म्हणजे वेगवेगळ्या लोकांप्रती आपल्या मनात जमा होत असलेला ग्रह असतो जो चक्रव्याढ व्याजाने वाढत जातो . मनात साठविलेल्या या अकाऊंट सोबत आणखी काही अकाऊंट लिंक केलेले असतात . त्यांचाही सांभाळ काही मंडळी मनापासून करतात . या लिंक अकाऊंटचे उ...