Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 14.11.23

Image
इगो सेटलमेंट मानसशास्त्राच्या भाषेत बोलायचे झाल्यास इगो हा प्रत्येक मानवाच्या व्यक्तिमत्वाचा एक अभिन्न भाग आहे व त्याचा अर्थ शास्त्राच्या दृष्टीने सांगायचा झाल्यास , आपल्या मेंदूमधील तो भाग जो सचेतन व अचेतन अवस्थांमधे संवाद घडवतो . हा भाग माणसाच्या सकस मानसिक विकासाच्या दृष्टीने फार उपयोगी असतो . परंतू आपण मात्र व्यावहारिकदृष्टीने इगो या शब्दाला जरा वेगळ्या अर्थाने वापरतो . खरे तर तो अर्थ त्या शब्दाच्या मूळ अर्थाचे ताणलेले रुप आहे . स्वत्वाची जाणीव होणे यांस इगो म्हणतात . परंतू या स्वत्वापलीकडे इतरांचेही स्वत्व असते हे समजूनच घ्यायचे नाही यांस आपल्या व्यावहारिक भाषेमधे त्या व्यक्तीमधे इगो आहे असे आपण म्हणतो . नव्या काळात प्रत्येकाला आपल्या स्वतंत्र विचारांनी जगण्याची मुभा मिळाली आहे व त्यासोबत बरेच वेळा हा इगो देखील मोठ्या प्रभावीपणे जोपासलेला आपल्याला दिसतो . जगण्याचे किंवा वागण्याचे स्वातंत्र्य हे एवढ्या जास्त प्रमाणात घेतले जाते की त्यामुळे जगण्याचे सामाजिक भान ब...

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

Image
लिव्हींग वील काकांच्या आजाराची तीव्रता वाढली त्या दिवशी मित्राचा मला फोन आला . तो मला म्हणाला , यार पैश्याची गरज आहे . माझ्याजवळचे सारे पैसे संपले . प्रचंड खर्च होतो आहे परंतू हवे तसे यश मिळत नाहीये . शिवाय बाबांना देखील फारच त्रास होतो आहे . त्यांचा त्रास बघवत नाही . पण काही इलाज नाही . डॉक्टर देखील नक्की काही सांगू शकत नाही . रोज नवनविन कॉम्प्लीकेशन्स होत आहेत . काय करु काही कळत नाही . तू पैसे पाठवू शकतोस का ? किमान पाच लाख तरी पाठव . मित्राला मी पैसे पाठवतो असे सांगितले . पैश्याची जुळवाजुळव करायला दोन दिवस लागतील असे देखील सांगितले . काकांच्या आजाराचा विचार करत असताना मला माझे मार्गदर्शक व अमरावतीच्या श्री . ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ . सत्यनारायण लोहीया यांनी बनविलेले लिव्हींग वील आठवले . त्यांनी बनविलेले लिव्हींग वील हा एक अत्यंत क्रांतीकारी प्रकार आहे . या मागचा त्यांनी मला सांगितलेला क्रांतीकारी विचार देखील मला आठवला . मित्राच्या वडी...