Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 11.04.23

Image
हुशार ॲप मित्राचा मोठ्या उत्साहात फोन आला , उद्या संध्याकाळी घरी ये . माझ्या मुलाने एक नवे ॲप डेव्हलप केले आहे . त्याचा इंजीनिअरींगचा प्रोजेक्ट आहे . पण त्याने कमाल केली आहे . गुगल च्या प्ले स्टोअर्सशी त्याचा संपर्क सुरु आहे . बहुदा ॲपलशी देखील बोलणे होईल . सारे व्यवस्थित झाले तर धमाल होईल . तू ये उद्या तुझ्याकडून आणखी काही सूचना आल्या तर त्या तो त्यात समाविष्ट करेल . त्याला तुला ते ॲप दाखवायचे आहे . किंवा असे कर मी त्याला आता पाठवू का ? माझा मित्र फारच डेस्परेट झालाय हे माझ्या लक्षात आले . त्याला मी आश्वासित केले की दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या कडे येईन . ठरल्याप्रमाणे मी त्याच्या घरी गेलो . त्याचा मुलगा व तो दोघेही त्या ॲपबद्दल अतिशय जास्त उत्साहात होते . मी त्या मुलाचे बोलणे ऐकू लागलो . खरोखरीच फारच अप्रतिम असे ते ॲप त्याने बनविले होते . नव्याने सुरु झालेल्या आर्टीफीशीयल इंटेलीजन्सचा वापर त्याने या ॲपमधे केला होता . या ॲपमधे एकदाच आपल्याला माहिती भरावी ल...

थोडा है थोडे की जरुरत है @ 04.04.23

Image
राईट टर्न आज पुन्हा ४ एप्रील . मला आठवते ती ४ एप्रील २०१४ ची रात्र . दवाखान्यात वेटींग रुम मधल्या बाकड्यावर मी कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करीत होतो . दुपारपासून सुरु झालेली धावपळ शांत झाली होती . दवाखान्यात भरती करणे , आयसीयू मधे शिफ्ट करणे , नागपूरला सध्या नेण्याची गरज नाही अशी शाश्वती मिळणे , भेटायला येणाऱ्यांची गर्दी , असे कसे होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न , सारे सारे आटोपून आयसीयू मधे ते व बाहेर रात्री गरज पडली तर रहावे म्हणून मी असे दोघेच दवाखान्यात होतो . सारी धावपळ संपेस्तोवर रात्रीचा एक वाजला होता . त्यामुळे झोप लागण्याची वेळ टळून गेली होती . झोपण्याआधी एकदा आयसीयू मधे जाऊन मी त्यांना बघून आलो . ते शांतपणे झोपले होते . खरे तर बोलण्याची इच्छा होती परंतू झोप लागली असल्याने मी फक्त जवळ जाऊन उभा राहीलो . क्षणभर . त्यांना असे दवाखान्यात भरती झालेले मी कधीच बघितले नव्हते . माझ्या स्मृतीपटलावर ते चित्रच नव्हते . इतर कुणी भरती झाले असेल तर मात्र त्...