Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 14.03.23

Image
त्यांना सोडावे लागेल .. भगवतगीतेमधे विद्यार्थ्यांचे गुण सांगताना असे सांगण्यात आले आहे की त्याने आपल्या घराचा त्याग करून गुरु कडे शिक्षा ग्रहण करण्यास गेले पाहिजे . आताही अनेक मुले बारावीचे शिक्षण झाले की मोठ्या शहरात शिक्षणाकरीता जातात . आधुनिक काळात याचा एक आणखी नवा अर्थ लागू करण्याची गरज आहे . तो म्हणजे मुलांना आपण दिलेल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढून त्यांना जगाचा थेट सामना करण्याकरीता तयार करणे . आई वडीलांनी जो कम्फर्ट झोन मुलांकरीता बनवून दिला असतो त्याच्या बाहेर पडल्याखेरीज किंवा आई - वडीलांनी त्यांना बाहेर पडू दिल्याशिवाय त्यांच्या जीवनाचा खरा विकास होत नाही . त्याकरीता निश्चितच मनावर दगड ठेवायला लागतो . परंतू असे केल्याशिवाय जमत नाही . अश्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असलेल्या माझ्या मुलीच्या बाबतीत कालची सायंकाळ मला अस्वस्थ करून गेली . पण शेवटी मात्र हेच जाणविले की निर्णय योग्य होता . सायंकाळी महाविद्यालयातून परत आलो आणि पुण्याहून मुलीचा फोन आला की तब्येत...

थोडा है थोडे की जरुरत है @ 07.03.23

Image
रंग आपल्याला काहीतरी वेगळं होतेय हे स्वानंदीला जाणवत होते . यावर्षीच हा बदल तिला जाणवत होता . स्वानंदी आता पंधरा वर्षांची झाली होती . होळी व धुलीवंदन जवळ येतेय म्हणल्यावर या वर्षी एक अनामिक हुरहुर मनात दाटू लागली होती . हवीहवीशी वाटणारी ही हुरहुर कुणालातरी सांगावी असही वाटत होते . एक दोनदा तिने आईला हे सांगण्याचा प्रयत्न केला परंतू ते सांगण्यासाठी मन धजावत नव्हते . भिती वाटत नव्हती पण लज्जा वाटत होती . हे काय आपल्याला होतंय भलतंच आणि हे आईला कसे सांगायचे असा प्रश्न मनात उभा रहात होता . नेहेमीप्रमाणे तिने आपल्या खोलीतल्या तिच्या आवडत्या बनी ला म्हणजे तिच्या लहानपणीच्या बाहुलीला सारे सांगितले . बनी , तुला ठाऊक आहे ? आज ना मला कसेतरी होतेय . मला ना त्या धुळवडीची भिती वाटतेय . पण त्या भितीसोबत मला कुणीतरी खूप रंग लावावा असे देखील वाटतेय . मला ना … माझ्या शाळेतल्या मैत्रीणी काहीतरी कुजबुजताना जाणवतात . त्या शेजारच्या वर्गातल्या एका हॅन्डसम मुलाबद्दल बोलत असतात . मी ...