Posts

थोडा है थोडे की जरुरत है @22.2.22

Image
सखा माझं आयुष्य संपुर्णपणे थांबलेलं होतं … अचानक एक जण माझ्या आयुष्यात आला आणि मला म्हणाला .. माझ्यासाठी गायचेय तुला … त्यावेळी मला जो उत्साह आला त्यापेक्षाही जास्त मला गाता येते याची मला आठवण झाली . अर्थात त्याने मला असे म्हणायला किंबहुना तो माझ्या आयुष्यात यायला कितीतरी वर्षे लागली . गेली काही वर्षे मला गाता येतं हे देखील मी विसरली होती . रोजचा स्वयंपाक आणि घर सांभाळणे या व्यतिरीक्त मला काही येतं हेच मी विसरली होती . माझ्या सभोवतालच्या लोकांना देखील त्याचा विसर पडला होता . मी त्यांना दोष देत नाही कारण माझ्या त्या घरातील चौकटीच्या पेक्षा मला काही वेगळं येते हे मीच तर विसरली होती ना ? मला त्या कामांमधे , घर सांभाळण्यामधे , घरच्या लोकांच्या तब्येती सांभाळण्यामधेच आनंद मिळत होता . तो मला मनापासून मिळत होता ज्याबद्दल माझी आजही तक्रार नाही . परंतू त्याचा परीणाम असा झाला की घरच्या लोकांनी अशी समजूत करून घेतली की मला केवळ तेवढेच येते आणि त्यासाठीच मी जन्म घेतला ...