Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.12.21

Image
एक छोटीशी पीन पेपरची ती बातमी वाचून मी सून्न झालो . कोरोनाच्या या संकटकाळामधे मुलांच्या मनावर फार ताण निर्माण झालाय हे मला लक्षात येत होते परंतू त्या ताणाचा परीणाम हा असा होईल असा विचार मी केला नव्हता . मध्यंतरी एका व्याख्यानाच्या दरम्यान बोललो होतो की सध्या पालकांची आणि शिक्षकांची भुमिका फार महत्वाची राहणार आहे . कारण मुलांच्या मनोभुमिकांवर सुयोग्य परीणाम करणारे व त्यांना ताणमुक्तीच्या दिशेने अग्रेसर करणारे हे दोनच घटक आहेत . कोरोनाचा सुरुवातीचा काळ सोडला तर त्यानंतर सर्वांनीच ऑनलाईन पद्धतीला स्विकारले व त्या माध्यामातून अभ्यास सुरु झाला . परंतू शाळा महाविद्यालये किंवा घरात देखील संवाद कमी झाला व परस्परांशी अवांतर बोलणेही कमी झाले . प्रत्येकाला मोबाईलच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वापराची सवय लागली व त्यामुळे थेट संपर्क व त्यामधून होणारा प्रभावी संवाद होईनासा झाला . या सर्व बाबींसोबतच या कोरोना काळाचा परीणाम एकुणच व्यवस्थांवर झाल्यामुळे मुलांच्या मनावर एक दडपण येणे...