थोडा है थोडे की जरुरत है @ 25.05.21
नाम ते क्रियापद प्रसिद्ध अभिनेता अनुपम खेर यांनी लिहीलेले एक पुस्तक मी सध्या वाचतोय . द बेस्ट थिंग अबाऊट यू इज यू . या पुस्तकात अनुपम खेर यांना आलेल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी व्यक्तिमत्व विकसनाचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न केला आहे . कला क्षेत्रात वावरत असताना त्यांना आलेल्या अनुभवांच्या आधारे त्यांनी या पुस्तकात विचार मांडलेत . अनेक वेगवेगळ्या विचारांसोबत त्यांनी मांडलेला एक विचार फार ठळकपणे जाणवला . माणसाच्या जीवनाचा प्रवास हा नाम ते क्रियापद असायला हवा . समज आल्यापासून प्रत्येकजण आपल्या जीवनाचा विचार करु लागतो . स्वतःच्या जीवनाबद्दल प्रत्येकाचे काही ना काही आराखडे असतात . त्याचा परीवार , सभोवतालची परीस्थिती आणि त्याच्यावर झालेले संस्कार हे त्याला जगण्याची दिशा प्रदान करतात . म्हणूनच प्रत्येकाची जगण्याची दिशा आणि पद्धती वेगवेगळी असते . परंतू अनुपम खेर म्हणतात त्या प्रमाणे प्रत्येकाचा प्रवास हा नाम ते क्रियापद व्हायला हवा . जगात जगत असताना प्रत्येकच जण आपल्य...