Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.12.20

Image
अर्बन अँक्स - २ ( मित्र ) अनू , सर्वात प्रथम तुला एक गोष्ट सांगतो , तुला काहीही झालेले नाही . तू अगदी नॉर्मल आहेस . जे काही तुला होतेय आणि जे कदाचित तुझ्या आजुबाजूच्या लोकांनी तुला सारखे जाणवून दिलेले आहे परंतू तसे काहीही नाही . हे प्रत्येकाच्याच आयुष्यात सध्या होतेय . ज्या आधुनिक काळात आपण जगतो त्या काळाच्या चकचकीत प्रक्रीयेचे हे सारे साईड इफेक्ट आहेत . त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुला काही विचित्र आणि समजावून सांगता येत नाही असे काही झालेय हे डोक्यातून काढून टाक . उलट मी तर तुझे अभिनंदन करीन की तुला हे तुझ्या मैत्रीणीला सांगता आले . अनेकांना तर ही अस्वस्थ अवस्था सांगता देखील येत नाही व त्यामुळे ते तसेच त्रस्त राहतात . स्री पुरुष सर्वांना हा असा त्रास सध्या होतोय , तू तो बोलून दाखवला हे तुझे मोठेपण आहे . एक अतिशय सुंदर आयुष्य तुला मिळलेले आहे आणि ते मनापासून आणि तुला वाटते तसे जगण्याचा तुला संपुर्ण अधिकार आहे . कारण आपल्याला आई वडीलांनी जरी जन्म दिला असल...