Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 24.12.19

Image
चक्राची गंमत सातव्या किंवा आठव्या वर्गातील गोष्ट असावी . अचानक एक गोष्ट आपल्याजवळ असावी असे वाटू लागले होते . खरे तर छोट्याश्या गावात रहात असल्याने त्या गोष्टीची आवश्यकता होती असेही नव्हते . त्याशिवाय भागत होतेच . शिवाय माझ्यासह माझ्या अनेक मित्र मैत्रिणींकडे ती गोष्ट नसल्याने त्याचे काही वाटत नव्हते . परंतू तरीदेखील विशिष्ट वयात त्या त्या वयानुरुप काही गोष्टी घडत राहतात व काही गोष्टी आवडू लागतात तसेच काहीसे माझे   देखील झाले होते . परंतू आतासारखी पटकन आई वडीलांकडे काहीही मागण्याची व्यवस्था नव्हती . आता मुले आपल्या आई वडीलांना मनात आल्याबरोबर काहीही मागू शकतात व आई वडील देखील आपल्या मुलाबाळांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्पर असतात . त्यावेळी देखील आईवडील आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार असायचेच , परंतू ते करताना त्यांना बराच विचार करावा लागायचा . अनेक गोष्टींची उपलब्धता नव्हती व त्यासोबतच पैश्याची तजवीज हा महत्वाचा भाग होता . ती सारी जुळवाजुळव करुनच क...