थोडा है थोडे की जरुरत है @ 19.11.19
गजरा नेहेमीप्रमाणे संजय कार्यालयातून थकून भागून निघाला . परंतू त्याने गेल्या अनेक वर्षात लावलेली एक सवय फार छान होती . कार्यालयात असताना मनापासून काम करायचे . परंतू बाहेर पडताना मात्र कार्यालयाला जसे कुलूप लागते तसे कार्यालयातील कामांना आपल्या डोक्यातही कुलुपबंद करायचे आणि मग घराकडे निघायचे . कार्यालयातील कामांचा ताण , तेथील समस्या या साऱ्या गोष्टी तेथेच सोडून घराकडे जायचे . त्यामुळे थकलेला असला तरी संजय तसा फ्रेश असायचा . कारमधे बसल्यावर मस्त त्याच्या खास म्युझीक कलेक्शन मधून काही सुंदर गाणी सुरु व्हायची व त्या गाण्यांसोबत तो देखील आणखी फ्रेश व्हायचा . घरी जाताना काय काय सर्प्राईज न्यायचे आहे याचा विचार डोक्यात सुरु व्हायचा . कारण बायको व मुले वाट बघत असणार याची त्याला खात्री असायची आणि रोज काहीतरी छोटेसे का होईना परंतू घरी न्यायचे आणि आजचे सर्प्राईज म्हणून आपल्या त्या गोष्टीमुळे घरच्यांचे उजळलेले चेहेरे बघणे त्याला फार आवडायचे . कधी कधी तर लहान मुलांप्रमाणे डो...