Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 22.10.19

Image
कार्यमग्न शांतता अमेरीकेतून चीन मधे आपल्या आईसोबत स्थलांतरीत झालेला तो छोटासा मुलगा तेथील कुंग फु शिकणाऱ्या काही टारगट मुलांच्या त्रासांमुळे खचून गेलला असतो . त्याला त्या मुलांचा सामना करण्यासाठी कुंग फु शिकायचे असते . कुंग फु शिकण्याच्या पद्धती काळानुरुप बदलत गेलेल्या असतात . नव्या जगात समोरच्याला संपेपर्यंत ठेचा असा हिंसेचा संदेश मुलांच्या मनात ठसवून कुंग फु शिकविले जात असते . अश्या वेळी या मुलाला एक जुन्या पद्धतीचे कुंग फु शिकविणारा शिक्षक भेटतो . काही दिवसाच्या प्रशिक्षणानंतर तो त्या मुलाला कुंग फु शिकणाऱ्यांचे तिर्थस्थान असलेल्या एका ड्रॅगन वेलचे पाणी पिण्यास घेऊन जातो . पर्वताच्या उंच शिखरावर वसलेल्या एका मंदिरामधे ती ड्रॅगन वेल असते ज्याचे पाणी पिणे ही प्रत्येक कुंग फु शिकणाऱ्याकरीता प्रेरणा असते . त्या ठिकाणी जाताना रस्त्यात त्या मुलाला अनेक अद्भुत गोष्टी दिसतात . परंतू एका ठिकाणी मात्र तो स्तब्ध होतो . पर्वताच्या टोकावर कुंग फु मधील एका विशिष्ट मुद्रेमधे ...