Posts

थोडा है थोडे की जरुरत है @24.09.19

Image
डक करता यावे ! त्याच्या कामामधे त्याला निराशा येऊ लागलेली असते आणि अश्या निराशेच्या स्थितीमधेच विचार करत तो रेल्वे स्टेशनवर बसलेला असतो . मनामधे नाही नाही ते विचार येऊ लागले असतात . आपल्याला करायचे काय आहे आणि आपण करतो काय आहे या संभ्रम निर्माण करणाऱ्या विचित्र अवस्थेत बसला असतानाच त्याचे बाॅस त्याला भेटायला येतात . बाॅस त्याला विचारतात , काय झाले ? त्याच्या मुळातच भिडस्त स्वभावामुळे तो सुरुवातीला काही सांगत नाही . पण बाॅसच्या आग्रहास्तव तो त्याच्या मनातील निराशेचे कारण बाॅसला सांगतो . तो सांगतो , सर मला काय करावे सुचत नाही . ज्या खेळासाठी मी ही नोकरी स्विकारली ते मला काहीच करता येत नाहीये . मी सध्या रणजी पर्यंतच खेळू शकतोय . त्याच्यापुढे मला मार्ग दिसत नाहीये . शिवाय येथे ड्युटी करावी लागते . येथे एकूण विचार केला तर या प्लॅटफार्म वरुन त्या प्लॅटफाॅर्मवर धावण्यामुळे माझी केवळ धावण्याची प्रॅक्टीस होऊन जाते परंतू खेळाचे काय करु सर ? कधी कधी असे वाटते की सारे सोडू...