Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 20.08.19

Image
बंधनाचे सुख सोशल मिडीयामुळे कधी कधी काही गोष्टी फार पटकन कळतात आणि त्यामुळे आपण अपडेट राहतो . अशीच एक बातमी आणि त्यासोबत एक फार सुंदर गाणे मला ऐकायला मिळाले . कधीकधी ध्यानी मनी नसताना आपल्या फार जास्त आवडीची गोष्ट अचानक आपल्यासमोर आली किंवा अनुभवायला मिळाली तर तो आनंद काही वेगळाच असतो . असाच काहीसा अनुभव मला आला . जुन्या काळातील एक नटी विद्या सिन्हा हिचे नुकतेच दुःखद निधन झाले . तिला श्रद्धांजली देणारा एक लेख फेसबुकवर माझ्या वाचण्यात आला . वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधे काम करणारी व सामान्य व्यक्तिमत्व सादर करणारी अशी ही गुणी अभिनेत्री आपल्याला सोडून गेली . तो लेख तिच्या सर्व भुमिकांचे वर्णन करणारा होता व त्या लेखकाने लेखाच्या शेवटी तिच्या अनेक चित्रपटांपैकी एका चित्रपटाचे गाणे जोडले होते . ते गाणे माझ्या अतिशय आवडीचे गाणे होते . परत एकदा ते गाणे बघण्याचा योग आला . प्रेमाच्या सुंदर भावनेचे वर्णन करणारे ते गीत संपुर्णपणे बघितल्यावर कधी नव्हे तो मी एका ओळीपा...