Posts

थोडा है थोडे की जरुरत है @25.09.18

Image
काळजी दुपारची वेळ . साधारण २ वाजले होते . सकाळच्या पहिल्या टप्प्यातील महाविद्यालयाची कामे आटोपून मी नेहेमीप्रमाणे जेवायला निघालो होतो . जरासा उशीरच झाला होता . त्यामुळे मी जरा घाईने माझ्या गाडीकडे निघालो होतो . तेवढ्यात दुरुन मला एका माणसाने जोरात आवाज दिला . सर , सर असे ओरडत तो माझ्या दिशेने येऊ लागला . साधारण पन्नाशीला असलेला तो माणूस जरासा घाबरलेला होता . त्याला माझ्याकडे येताना बघून मी थांबलो व तो इतक्या जोरात ओरडला होता की मैदानात असलेल्या विद्यार्थिनी व इतर मंडळी देखील थांबून काय सुरु आहे ते बघू लागली . माझा   जवळ आल्यावर जरा तो शांत झाला . त्याच्या घाबरण्याचे कारण त्याने मला सांगितले . त्याची मुलगी माझ्या महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकते असे त्याने धापा टाकत मला सांगितले . माझ्याकडे येताना तो जवळपास धावत आल्याने त्याला दम लागला होता . नेहेमीप्रमाणे मी प्राथमिक प्रश्न त्याला विचारला की मुलीचे नाव काय आणि ती कोणत्या विद्याशाखेला प्रवेशित आहे ? कला , वाणिज्...