थोडा है थोडे की जरुरत है @24.04.18
‘ अतुल ’ नीय फोनवर आपल्या वडीलांबाबत कुणीतरी चुकीचे बोलतेय असे माझ्या मुलाला जाणविले आणि म्हणून त्याने तो अनोळखी नंबरवरुन आलेला फोन कट करुन टाकला . मी बाहेरुन परत आल्यावर मला तो म्हणाला , बाबा कुणाचा तरी फोन आला होता आणि ते तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचे बोलत होते . मी जरा विचारात पडलो . माझ्याबद्दल चुकीचे ? म्हणजे काय म्हणत होते ? माझ्या पोराला सांगताना जरा जड जात होते . कसेबसे त्याने मला सांगितले , बाबा , ते म्हणाले की तुझ्या बापाला सांग की त्या नंबरवर जर तुम्ही एक तासात फोन केला नाही तर ते तुम्हाला बदडणार आहेत . सहाजिकच माझ्या पोराला फोनवर मिळालेला हा संदेश घाबरवणाराच होता . नंबर अनोळखी असल्याने मी देखील जरा विचारात पडलो होतो . परंतू अजूनही मला जरा शंका होती . त्यापुढे माझा मुलगा म्हणाला की बाबा ते बोलताना रागाने नाही तर हसून बोलत होते . नंबर ओळखीचा नसला तरी मी एका निर्णयाप्रत पोहोचलो होतो . हसून माझ्याबाबत अश्या प्रकारे बोलण्याचा प्रकार एकच जण करु शकतो याची ...