Posts

थोडा है थोडे की जरूरत है @ 24.10.17

Image
बॅक डेट मैदानावर फिरताना कधीकधी काही लोकांची पु . ल . देशपांडेच्या भाषेत सांगायचे झाल्यास फर्लांगभर ऐकू जाणारी कुजबुज कानावर पडते . त्यांच्या बोलण्यात कधीकधी मजेदार विषय येतात तर कधी कधी ते आपल्याला विचारात पाडतात . त्या दिवशी अशीच एक कुजबुज माझ्या कानावर पडली . कोणत्यातरी कार्यालयात काम करणारे ते कर्मचारी असावेत कारण त्यांच्या बोलण्यातील विषयावरुन मला तो अंदाज सहज बांधता आला . एका माणसाचे काहीतरी काम अडले होते . त्या कामासाठी निर्धारित वेळ देण्यात आली होती परंतू नेहमीप्रमाणे जो करतो त्यालाच साहेब कामे जास्त सांगतात या उक्तीप्रमाणे तो ते काम ठराविक वेळेत इतर कामांमुळे करु शकला नाही . आता वेळ निघून गेल्याने काय करावे हे त्याला सुचत नव्हते व त्यासाठी तो त्याच्या सहकाऱ्याचा सल्ला घेत होता . त्याचा सहकारी हा सराईत कर्मचारी असावा आणि म्हणून त्याने सर्वप्रथम त्याला शांत केले . असे होत असते आणि तू जास्त ताण घेऊ नको असे सांगून त्याने त्याचा ताण कमी करण्याचा प्रयास ...