थोडा है थोडे की जरूरत है@19.09.17
ढणट् टटर टटर … गणपतीच्या दिवसांमधे हा ढणट् टटर टटर असा आवाज आपल्या बरेच वेळा कानावर पडत असतो . हा आवाज स्थापनेच्या किंवा विसर्जनाच्या मिरवणूकींमधे वाजणाऱ्या ढोल ताश्याचा असतो . सध्या तर वेगवेगळ्या गावात अशी ढोल ताश्याची वेगवेगळी पथके तयार व्हायला लागली आहेत . सोबतच यामधला महिलांचा सहभाग देखील लक्षणीय व स्वागतार्ह आहे . मोठा ढोल गळ्यात बांधून वाजविणे हे तसे मेहनतीचे काम आहे परंतू मुली व महिला देखील यामधे सहभागी होतात व एकंदरीत या ताश्याच्या आवाजाने या गणपतीच्या दहा दिवसात वातावरण एकदम चैतन्यमयी होऊन जाते . हा आवाजच इतका तालबद्ध असतो की प्रत्येकाचे पाय जागच्या जागी थिरकायला लागतात . या ढोल ताश्याच्या तालावर नाचणे हा देखील एक वेगळ्या आनंदाचा अनुभव देतो . अर्थात अनेकांना तो घेताच येतो असे नाही . परंतू काही लोक मात्र फारच वेगळे असतात . जीवन आनंदातच जगायचे व जीवनातील छोट्या छोट्या क्षणांना देखील व . पु . काळे म्हणतात त्याप्रमाणे महोत्सवामधे परावर्तीत करायचे असे त्या...