Posts

थोडा है थोडे की जरुरत है @ 20.07.21

Image
रीक्राफ्टींग - २ जपानचा तो मुलगा रीक्राफ्टींग च्या जादूबद्दल सांगू लागला आणि आमच्यापैकी प्रत्येकाला त्याच्या संकल्पनेबद्दल कौतुक तर वाटलेच परंतू आपल्या कामाकडे या दृष्टीकोनातून बघण्याची एक नवी दिशा प्राप्त झाली . तो म्हणाला , सबंध जगामधे कामाच्या त्याच त्या पद्धतीमुळे आणि प्रक्रीयांमधील जटीलतेमुळे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात काकांनी सांगितल्याप्रमाणे नैराश्य आलेच . या अश्या मानसिक स्थितीपासून कोणताच देश सुटला नाही . त्यानंतर प्रत्येकच देशात मानव संसाधन विभागातर्फे याबाबत संशोधन करण्यात आले व त्यामधे जपान या देशाने बाजी मारली . काकांना आला त्याप्रकारचा कंटाळा येऊ नये म्हणून त्यांनी एक अत्यंत सुंदर योजना तयार केली व त्या योजनेची माहिती देण्याकरीता तसेच तिला स्विकार्य बनविण्याकरीता त्यांनी वेगवेगळ्या पातळीवर वर्कशॉप आणि सेमीनार्स आयोजित केले . याकरीता त्यांनी प्रभावशाली व्यक्तींना पाचारण केले . देशकार्य असल्याने त्यांनी देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केले व हळू हळू बदल ह...