Posts

थोडा है थोडे की जरुरत है @21.08.18

Image
भारत माता की जय कारगील चे युद्ध सुरु झाले . भारताच्या शांती संदेशानंतर देखील पाकिस्तानने नेहेमीप्रमाणे आपल्या देशाच्या पाठीत सुरा भोसकला . आपल्यातूनच विभाजित होऊन आपल्यावरच उलटणाऱ्या आपल्या शेजारी राष्ट्राने एक अतिशय कठीण युद्ध लढण्यास भाग पाडले . पर्वतीय क्षेत्रातील सर्व उंच ठिकाणे काबीज करुन त्यांनी दहशतवाद्यांच्या मदतीने जम्मु श्रीनगर हा १ - डी हायवे बंद पाडला . रसद बंद पडली व अश्या जटील स्थितीमधे भारतीय सेना जिवाची शर्थ करुन लढण्यास सज्ज झाली . राजपुताना रायफल्स चा एक जवान बचान सिंह सुटीवर गेला असताना दोनच दिवसात मातृभूमीची रक्षा करण्यास परत निघाला . दोन लहान मुलांना पत्नीकडे सोपवून घरुन निघताना त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव होते . माझ्या मुलांना आणि स्वतःला सांभाळ असे तो केवळ डोळ्यांनी त्याच्या पत्नीला , भावनाला सांगत होता . भावनाच्या भावना तर तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुंमुळे स्पष्ट कळत होत्या . ह्रदयात कालवाकालव होत होती . आधल्या दिवशी रात्री पतीची बॅग दोनच ...